बेलापूर कोल्हार रस्त्यावर बुलेट व डिस्कवर गाडीचा अपघात, 108 नंबर ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने स्वतः खासदार सदाशिव लोखंडे यांनी गाडी देऊन अपघातग्रस्तांना केले दवाखान्यात दाखल.

बेलापूर कोल्हार रस्त्यावर बुलेट व डिस्कवर गाडीचा अपघात, 108 नंबर ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने, स्वतः खासदार सदाशिव लोखंडे यांनी गाडी देऊन अपघातग्रस्तांना केले दवाखान्यात दाखल.
बुलेट – डिस्कव्हर दुचाकीच्या झालेल्या समोरासमोर अपघातात दुचाकीस्वाराचे दात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.आज
सकाळी साडे अकराच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव – कोल्हार रस्त्यावरील फर्याबागाजवळ रविवारी घटना घडली.
अपघातामध्ये विजय बाबुराव उपाध्ये असे जखमी नाव आहे. (रा.सोनगाव, सात्रळ, ता.राहुरी)असल्याची सांगण्यात आले. ते दोघे पती -पत्नीसह मुले दुचाकीवरून बेलापूराकडे लग्नाला चालले होते. त्यावेळी तेथे अपघात घडला. तेथील
अपघाताची माहिती मिळताच उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली होती. त्यावेळीच तेथूनच उक्कलगाव -मार्गे -संगमनेरला कामानिमित्त जात असतानाच गर्दी पाहून तेथे थांबून व्यस्त दौरा असताना तेथील अपघातग्रस्ताच्या यांच्या मदतीला खासदार सदाशिव लोखंडे धावून आले त्यावेळी आपलीच स्वतःची गाडी पाठवून अपघातग्रस्ताना श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असता, तेथील प्राथमिक उपचाराहोई -पर्यत उक्कलगावमध्येच थांबून राहिले.त्यांनतर ते संगमनेरला रवाना झाले. यामध्ये समोरील अपघातात एकलहरे आठवाडी येथील धर्माजी शिंदे यांचा मुलगा -सुन किरकोळ जखमी झाले असून दोघे पती -पत्नी संगमनेरला बहिणीकडे चालले होते. तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत अपघातग्रस्ताची चौकशी केली असता जखमी विजय उपाध्ये यांची प्रकृती बरी असल्याची हाँस्पीटलमधून सांगण्यात आले.
त्यावेळी पं.स.माजी सभापती आबासाहेब थोरात, रुद्रा न्यूज संपादक एन डी चोरमले विकास थोरात, अनिल थोरात, सुरेश रामराव थोरात, खासदाराचे स्वीय शिवाजी दिशागत, शेतकरी संघटनेचे प्रकाश थोरात आदीनी मदतकार्य केले.
रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी शासनाने 108 अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिलेली असल्याने ती सेवा सध्या कुचकामी ठरत आहे. 108 अँब्युलन्स अपघातस्थळी उपलब्ध न झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सेवेबद्दल रोष अनावर झाला. तेथील स्थनिक ग्रामस्थांनी
भ्रमणध्वनीवरून माहिती देवूनही 108 अपघातस्थळी आलेली नव्हती.
उक्कलगाव : बुलेट – डिस्कव्हर दुचाकीच्या समोरासमोर अपघातात एकाचे दात पडले असून त्या जखमींना साखर कामगार हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. उक्कलगाव मार्गे संगमनेरला कामानिमित्त जात असताना थांबून
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली जखमीची विचारपूस.