वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे ,छप्पर, उडाली विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडली. तात्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी नागरिकांची मागणी.

वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे ,छप्पर, उडाली विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडली. तात्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी नागरिकांची मागणी.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गणपतवाडी शिवारात शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे ,छप्पर, उडाली विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. शासनाने आम्हाला तातडीची मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाकडून केली जात आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाची लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख यांनी केली पाहणी मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन
मानोरी परिसरातील गणपत वाडी येथे शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला त्यावेळी पाटीलबा ठकाजी बाचकर यांच्या राहत्या छपरा चे छप्परच वादळात उडून गेले. तसेच पावसामुळे भिंत कोसळली तसेच जनाबाई सखाराम विटनोर यांच्या राहत्या घरावरील व पडवीवरील वीस पत्रे उडून सुमारे शंभर फूट रस्त्याच्या कडेला जाऊन पडले., दगडी भिंत ही कोसळली देवका सावळेराम पिलगर यांचं राहत्या घरचे छप्पर उडून गेले, व छपरा खाली दोन शेळ्या दबल्या गेल्या शंकर मल्हारी पिसाळ यांचे जनावरांचे छप्पर उडाले. तसेच शकील अयुब पठाण यांच्या ही घरावरील पत्रे उडून बाजूला पडले. मोटरसायकलचे नुकसान झाले तसेच नववर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली गरीब कुटुंबाचे मोठे आर्थिक हानी झाली आहे. संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच या वादळामुळे विजेचे मोठे खांब पडून विद्युत वाहक तारा तूठून पडल्या सुदैवाने विजेचे पोल व तारा तुटून पडल्या त्यावेळी विद्युत प्रवाह चालू नव्हता अन्यथा मोठी हानी झाली असती. आम्हाला शासनाने ताबडतोब पंचनामे करावे व तातडीने मदत मिळावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत . यावेळी नुकसान झालेल्या कुटुंबाचे भेट घेऊन व प्रत्यक्ष पाहणी करून लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख यांनी यावेळी लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी गणपत वाडी परिसरातील ग्रामस्थ बबनराव देवकाते मानोरी सोसायटीचे संचालक दत्तात्रय आढाव माजी संचालक
चांद भाई नन्नू भाई शेख कारभारी पिलघर कोंडीराम विटनोर तेजस बाचकर शंकर बाचकर जबाजी बाचकर रामदास बचकर संजय देवकाते साहेबराव देवकाते सिकंदर शेख उस्मान शेख आकाश चोथे हरिभाऊ देठे बाबा विटनोर अमीन शेख विठ्ठल विटनोर भास्कर देवकाते गंगा बाचकर भाऊसाहेब बाचकर ताबाजी बाचकर भाऊसाहेब देवकाते रामदास देवकाते नामदेव पिलघर चांद पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते