गोटुंबे आखाडा येथे घरच्याच अंगणात प्रजासत्ताक दिन साजरा
शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी दिली ध्वज सलामी
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील बाल गोपाळांनी शाळा बंद असल्यामुळे ध्वजारोहणाला उपस्थित न राहता आल्यामुळे या बालकांनी निराश न होता घरच्या घरीच भारत देशाचा तिरंगा बनवून त्याला पेंटिंग करून तो झेंडा घराच्या अंगणात उभारून त्या झेंड्याला 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायले. सदरील बालक हे मागच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी पण त्यांना शाळा बंद असल्या कारणामुळे शाळेत सहभागी न होता आल्यामुळे या चिमुरड्यांनी आपली देशभक्तीचे एक अप्रतिम उदाहरण देत देशापोटी असलेले प्रेम दाखवून दिले. देशात कोरोणाने थैमान घातल्यामुळे शाळा बंद आहेत. यामुळे या बालकांनी स्वतःच्या खाऊच्या पैशांची बचत करून ध्वज बनवून त्याला पेंटिंग करून ध्वज उभारला व त्या ध्वजास आकर्षक फुगे लावून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खालीलप्रमाणे बालगोपाल उपस्थितीत होते. सोहम शिवाजी दवणे, स्नेहल शिवाजी दवणे, आरोही अंकुश दवणे, सोनाली अंकुश दवणे, समृद्धी अंकुश दवणे, वैष्णवी शिवाजी दवणे, तुषार संदीप सुसे, श्रावणी संदीप सुसे, निखिल सतीश सूसे, इत्यादी बालकांनी ध्वजारोहण कार्यक्रम राबविला