एम एस सी बी च्या मनमानी कारभारामुळे शेतकरी लागणार देशोधडीला

एम एस सी बी च्या मनमानी कारभारामुळे शेतकरी लागणार देशोधडीला
राहुरी श्रीरामपूर नेवासा राहता तसेच नगर जिल्ह्यामध्ये एम एस सी बी ने पठाणी वसुली चालू केलेली आहे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना पैसे भरण्यास सांगितले जमेल त्या शेतकऱ्यांनी पैसेही भरले परंतु त्या वेळेस शेतकऱ्यांची पिके पेरणी झाली नव्हती आता कांदा ऊस गहू हरभरा पिके उगवून वाढीस लागले आहे तेच लाईट बंद करून एमेसिबी ने पठाणी वसुली चालू केली लाईट बिल भरा नाहीतर लाईट बंद या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांची उभी राहिलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवत आहे त्यातच राज्यशासन शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे खते बी-बियाणे औषधे यांच्या वाढत्या किमती व उत्पादन केलेल्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला तरी शेतकरीराजा तग धरून आहे शेतीला जोडधंदा पशुपालनाचा आहे तर तोही धंदा खाद्य चारा महाग खर्च रुपया उत्पन्न 50 पैसे असल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे शेतकरी सावरण्याच्या परिस्थितीत राहिला नाही पिके उभी करण्यास शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च या बियाणे खते औषध यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालेला आहे पिके निघाल्यावर लाईट बिल भरतो असे शेतकऱ्यांचे मत असतानासुद्धा ट्रांसफार्मर बंद करत असल्यामुळे शेतकरी राजा ची चिंता वाढत आहे राज्य शासनाने याबाबत विचार करावा व पठाणी वसुली थांबवावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे