दिव्यांगांना कृत्रीम अवयवांच्या साहित्यासाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन
दिव्यांगांना कृत्रीम अवयवांच्या साहित्यासाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन
दिव्यांग व्यक्तींनी शिबीराचा लाभ घ्यावा समाज कल्याण विभाग व दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे आवाहन
दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयवांचा पुरवठा करणे या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सोमवार दि.२० फेब्रुवारी ते दि.२४ फेब्रुवारी दरम्यान खालील नमूद दिवशी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दिव्यांगांनी तसेच गरजूंनी लाभ घेण्यासाठी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग व्यक्तीना कृत्रीम अवयवांचा पुरवठा करण्यासाठी तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये खालील प्रमाणे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरामध्ये Stick with seat, walking stick single, walking stick tripod, walking stick qudripod,crutches, elbow crutches, tricycle, wheel chair, walker hearing aids या सारख्या साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे तरी गरजूंनी नमूद शिबिराच्या दिवशी नजीकच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच नमूद केलेल्या ठिकाणाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एम.शिंदे, वै.सा.का.अंकुश नखाते यांनी तसेच विजय कान्हेकर, जिल्हा दिव्यांग कल्याण पुनर्वसन केंद्र बीड यांनी केले आहे. तरी लाभार्थांनी दिव्यांगाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो सह आदी कागदपत्रे सोबत आणावेत सदर शिबीराचे आयोजन हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र बीड यांच्या समन्वयातून होणार असून अधिक माहितीसाठी विजय कान्हेकर संपर्क क्र.9921740999, निर्मळ सतिश संपर्क क्र.8237277983 यांच्याशी संपर्क साधावा.
तालुकास्तरावर दि.२० ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणार शिबीर
दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयवांच्या साहित्यासाठी सोमवार दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय माजलगांव व उपजिल्हा रुग्णालय, गेवराई, तर मंगळवार दि.२१ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी व सामाजिक न्याय भवन बीड , तर बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालय अंबाजोगाई व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरुर, तसेच गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय धारुर व उपजिल्हा रुग्णालय पाटोदा, तसेच शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय वडवणी व उपजिल्हा रुग्णालय आष्टी येथे शिबीर होणार आहे तर शिबिराची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. तरी गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.