साडेतीन शक्तीपीठे मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत करण्याचा विक्रमसाठी सज्ज*
*साडेतीन शक्तीपीठे मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत करण्याचा विक्रमसाठी सज्ज*
…इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले जाणार ….
अहमदनगर- महाराष्ट्राच्या चार टोकाला असलेल्या चार शक्तिपीठांचे विशेष असे महत्त्व असून मोटरसायकलवर ते कमीत कमी वेळेत पार करणे हे एक अवघड अशी गोष्ट आहे. हे चार शक्तिपीठ मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प अहमदनगरचे मोटार सायकलपटू श्री शरद काळे पाटील यांनी सोडला आहे.महाराष्ट्र राज्यात असलेली साडेतीन शक्तीपीठ मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत पूर्ण करून नवीन विक्रम करण्यासाठी सोनईचे सुपुत्र श्री शरद काळे पाटील हे आज रवाना झाले. त्यांना शुभेच्छा देताना श्री संदीप कुसळकर, उद्योजक श्री मुकेश भळगट , सार्वमंथन चे पत्रकार मोहन शेगर सामनाचे पत्रकार नवनाथ कुसळकर, एकनाथ कुसळकर प्रस्थान पर शुभेच्छा दिल्या. तसेच शरद काळे पाटील हे
नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे रेणुका मातेचे मंदिर , उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथे भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचे मंदिर अशी तीन शक्तीपीठ आहेत व नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. हे अर्ध शक्तीपीठ असून हे चारही मिळून साडेतीन शक्तीपीठ होतात . शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी सहा वाजता काळे पाटील हे मोटार सायकल वरून यात्रेला सुरुवात करतील. माहूर ते तुळजापूर हे साडेतीनशे किलोमीटर अंतर दुपारपर्यंत पार करून ते तुळजापूरचे दर्शन घेऊन सायंकाळपर्यंत कोल्हापूरला पोहचतील. संध्याकाळी कोल्हापूरचे दर्शन घेऊन ते नाशिक जिल्ह्यातील वणी कडे प्रयाण करतील. शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कमीत कमी वेळेत यात्रा पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प असून त्यासाठी त्यांना ११५० किमी अंतर पार करावे लागेल. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी मातेचे दर्शन, आरती, विजिटर्स रजिस्टर मध्ये नोंद , लॉग बुक, फोटो आदी गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे. गाडीला जीपीएस ट्रॅकर बसविले असून कोणीही त्यांना घरबसल्या ट्रॅक करू शकणार आहे. त्यांना ट्रॅक करण्यासाठी http://35.200.231.106/vts-new/index.html वर लॉग इन करून ईमेल kp@123 असून password 123 आहे. ट्रॅक करण्यासाठी काही अडचण आल्यास श्री संजय टेमक यांच्याशी 9860054877 या नंबर वर संपर्क करावा.
अष्टविनायक यात्रा मोटरसायकलवर फक्त बारा तास बारा मिनिटात पूर्ण करण्याचा त्यांचा विक्रम आजही आबादित आहे. साडेतीन शक्ती पिठाची संपूर्ण यात्रा कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प असून हा पूर्ण झाल्यावर याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् व वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया मध्ये नोंदविली जाणार आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावावर असून याही विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर होईल अशी खात्री व विश्वास त्यांच्या अनेक मित्रमंडळींनी व्यक्त केली आहे.