शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करणार

गेवराईत शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करणार
गेवराई येथे यंदा स्तुत्य उपक्रमाद्वारे भव्य दिव्य अशी शिवजन्मोत्सव मिरवणूक घोडेस्वार रथातून निघणार आहे. या मिरवणूकीत शहरातील विविध शाळेतील मुले – मुली सहभागी होणार असुन सकाळी काढण्यात येणार आहे. महिलांसह विद्यार्थांसाठी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार असुन या जन्मोत्सवाची शहरात जय्यत तयारी सुरु झाली आहे.
शिवप्रेमी शिवकालीन वेषभुषा परिधान करुन या मिरवणूकीत शिवकालीन देखावे देखील सादर करण्यात येणार आसल्याने या मिरवणूकीची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना आता लागली आहे.
यंदा १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 11 वाजता शिवजन्मोत्सव अश्वारूढ रथातून सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.
या मिरवणूकीत यंदा शहरातील सर्व शाळेतील जवळपास सर्वच विद्यार्थी सहभागी होणार आहे. गेवराईत होत असलेली स्तुत्य उपक्रमाच्या जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रामांची रेलचेल राहणार आहे.
महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा होऊन होऊन बक्षिसांची लयलूट राहणार आहे. सर्व धर्मीय हजारो शिवप्रेमी या जयंतीची गुन्या गोविंदाने सध्या जय्यत तयारी करत असुन हा जन्मोत्सव विना वर्गणीचा साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे लोक सहभागातून होत आहे.
छञपती शिवाजी महाराज चौकातून निघणार असुन अनेक शिवप्रेमी बांधव शिवकालीन पोषाख परिधान करुन यामधे सहभागी होणार आहेत.तसेच शिवकालीन देखावे,चित्त थरारक प्रत्याक्षिक, बॅन्ड व झांज पथकांचा गजर या मिरवणूकीचे खास आकर्षण राहणार आहे.शहरातील व तालुक्यातील हजारो सर्व धर्मीय शिवप्रेमी बांधव या मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभागी होणार असुन डोळ्याचे पारणे फिटतील असे नियोजन
या मिरवणूकीचे जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी केले आहे. दरम्यान गेवराईतील या भव्य दिव्य अशा निघणा-या मिरवणूकीची उत्सुकता आता तालुक्यातील शिवप्रेमी बांधवाना लागल्याचे दिसून येत आहे.