दशानन रावण दहणाची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही हिंदू धार्मि्यांसाठी पूजनीय- सागर बेग

दशानन रावण दहणाची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही हिंदू धार्मि्यांसाठी पूजनीय- सागर बेग
श्रीरामपूर (प्रतिनिधी):- दशानन रावण दहणाची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही हिंदू धार्मि्यांसाठी पूजनीय असून दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सनातन हिंदू संस्कृतीतील आनंदाची सुरुवात म्हणून रावण दहनाकडे बघितले जात असेल तर त्याबरोबरच जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्तीचा देखील हिंदूंनी नायनाट करून दहन केले पाहिजे असे परखड विचार राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे नेते सागर बेग यांनी खंडाळा येथील दशानन दहन कार्यक्रमात व्यक्त केले.
राहाता तालुक्यातील खंडाळा येथे भगवती माता मित्रमंडळ आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या संयुक्त विद्यमानाने व श्रीरामपूर शहराजवळील शिरसगाव हद्दीतील इंदिरानगर भागात आयोजित करण्यात आलेल्या दशानन रावण दहन कार्यक्रम सागर बेग यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते खंडाळा येथे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,आज आपल्या देशात जिहादी प्रवृत्ती मोठ्याप्रमाणात डोके वर काढत असून लवजिहाद,लँड जिहाद,अल तकीयाजिहाद वाढले असून लवजिहाद मध्ये आजही हिंदू मुली फसत आहेत त्यांचे धर्मांतरण होत आहे ही अत्यन्त चिंतेची आणि जागरूक होण्याची गोष्ट असून आज या जिहादी मानसिकतेचे खऱ्या अर्थाने दहन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
https://www.youtube.com/@rudraanews-5101
याप्रसंगी भगवती माता मित्रमंडळ व राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.



