संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्सहात साजरी
संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्सहात साजरी
— वारकरी संप्रदायातील महान संत श्रेष्ठ श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री संत सेनाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुक झेंडा चौकात आल्यानंतर समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुभाष सोनवणे, प्रतापराव हुडे, गोरक्षनाथ कणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे सरपंच महेंद्र साळवी अरुण नाईक अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड विलास मेहेत्रे अनिल पवार भास्कर बंगाळ यांनी पुजन केले.
सकाळी मनोज कुटे व सौ.स्नेहल कुटे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.संत सेना महाराजांची मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर बेलापूरचे प्रथम नागरीक तथा सरपंच महेंद्र साळवी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड समता परिषदेचे प्रकाश कुऱ्हे चंद्रकांत नाईक पत्रकार देविदास देसाई भास्कर बंगाळ शिवाजी वाबळे आदिंनी संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे ,भिमराज हुडे, सुनिल सोनवणे, गोरक्षनाथ कणसे ,सागर हुडे, नंदू भागवत ,रमेश कुटे, विजय हुडे, महेश जायभार, कैलास चायल, कनजी शेठ टाक, रमेश टाक ,विजय शेजुळ, सतीश सोनवणे, बबनराव रावताळे, प्रशांत बिडवे शेखर कुटे राजेंद्र बोरसे हरिभाऊ वैदय ,गणेश शेजुळ, निलेश हुडे, आनंद वैदय ,मेजर मुंकुंद कुटे, दत्तात्रय जाधव, बाबु वैदय, किरण भागवत, अशोक आहेर, विजय बोरसे, सुधीर सोनवणे, हरिष शेजुळ, संजय सोनवणे, नवनीत भागवत, सुर्यकांत हुडे, गणेश कणसे, राजन सोनवणे, हरिहर जाधव, कृष्णा भागवत, सुभाष सोनवणे, प्रतापराव हुडे, रविंद्र हुडे आदिंनी विशेष प्रयत्न केले.