ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
तिळापूर जिल्हा परिषद शाळेत बालगोपाळांनी घेतले योगाचे धडे.

तिळापूर जिल्हा परिषद शाळेत बालगोपाळांनी घेतले योगाचे धडे.
राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रूपनर सर व जवंजाळ सर यांनी योग प्राणायामाचे पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले यावेळी शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थ्यांना बसवून योगाचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही प्रात्यक्षिक करताना आनंद लुटला.
तसेच रोज सकाळी लवकर उठून प्राणायाम करण्याचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व योग व प्राणायाम शरीराला होणाऱ्या उपयोगाचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.