तिळापुर रस्त्यांचा झाला खेळखंडोबा. शासकीय अधिकार्यांचा ठेकेदाराना राहिला नाही धाक.
तिळापुर रस्त्यांचा झाला खेळखंडोबा. शासकीय अधिकार्यांचा ठेकेदाराना राहिला नाही धाक.
राहुरी तालुक्यातील तिळापूर मध्ये रस्त्यासाठी निधी येतो पण निधीचा वापर होताना दिसून येत नाही महाडूक सेंटर ते तिळापुर रस्त्याचे काम चालू होऊन दोन वर्षे उलटून गेली, तरी रस्ता पूर्ण होताना दिसत नाही. राहुरी तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नद्यांच्या काठावर तिळापुर वसलेले असल्याने या गावातून बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. रस्त्याचे कामे मंजूर झालेले असताना देखील रस्त्याचे कामे करून घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येत आहे. ग्रामस्थांनी विचारणा केली तर केविलवाणी उत्तरे दिली जातात, आत्ताच आमदार निधीतून आमदार लहुजी कानडे यांनी रस्त्यासाठी मोठा निधी दिला परंतु ठेकेदाराने काम निकृष्ट केले याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्या, परंतु काही नागरिकांना बरोबर घेऊन चुकीची माहिती दिली जात आहे रस्त्याचे काम अशाच पद्धतीने आहे असेच होणार, याच पद्धतीने उत्तरे दिली जातात. ज्या पद्धतीने कामाचे टेंडर झाली आहे त्या पद्धतीने काम झालेले नसल्याने कामांमध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहे. माती मिक्चर मुरूम टाकला गेला तरी सार्वजनिक बांधकाम लक्ष देण्यास टाळाटाळ का करते ? हे नागरिकांना समजायला तयार नाही. दहा ते पंधरा वर्षांनी रस्त्याचे कामे होत आहे, त्यात अशा निकृष्ट पद्धतीने कामे होत आहे तरी सार्वजनिक बांधकाम याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसून येत नाही सार्वजनिक बांधकाम राहुरी अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांना पाठीशी घालताना वरिष्ठ अधिकारी दिसून येत आहे. ह्याच कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे अखिल भारतीय मानवाधिकार मिशन महाराष्ट्र अध्यक्ष विलास गिते यांनी बोलताना सांगितले काम आजच खराब झाले आहे वारंटी असून काय उपयोग काम आजच चांगली करून घेत नाही तर उद्या काय दुरुस्त करून घेणार असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी अहमदनगर जी जिल्हाध्यक्ष धनंजय माने उपाध्यक्ष किरण जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते
काम चालू झाल्यापासून वारंवार तक्रारी केल्या आहेत काम निकृष्ट पद्धतीने केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनीयरशी संपर्क करून कामाची पाहणी करण्यासाठी बोलावले आहे. आम्ही येऊन गेलो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील मिलीभगत करून रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे भासवत आहे परंतु या संदर्भात मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संघटनेमार्फत दोषीवर कारवाई होईपर्यंत लवकरच उपोषणास बसणार आहे.
अखिल भारतीय मानवाधिकार मिशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
विलासजी गीते
ठेकेदार काम करत नाही आम्ही त्यांना नोटिसा काढले आहेत परंतु, कुठल्याही उपयोग होत नाही. संगमेश्वर रस्त्याचे काम फायनल झाले आहे, आम्हाला एवढे एकच काम नसून खूप कमे आहेत. जेवढे काम झाले आहे तेवढेच संबंधित ठेकेदाराला बिले अदा करणार आहे. कामाचा दुरुस्ती टाइम दोन वर्षाचा आहे काम खराब झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराकडून काम दुरुस्त करून घेईल.
सार्वजनिक बांधकाम विभाग
इंजिनीयर