ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या जिल्हापरिषद शाळेची दखल घेत

*पोखरी (घाट) ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या जिल्हापरिषद शाळेची दखल घेत सोमवारी बैठक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांचे पत्रक:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
बीड तालुक्यातील मौजे.पोखरी (घाट)येथील ऊसतोड मजूरांनी लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून गावात टोलेजंग ईमारत बा॔धली असून उर्वरीत बांधकामासाठी दि.२२ डिसेंबर रोजी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती सांगत उर्वरीत बांधकाम निधीसाठी मदत करण्याची विनंती केल्यानंतर अजित पवार यांनी ग्रामस्थांचे कौतुक करत निधी उपलब्ध करून देऊन शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या अनुषंगानेच अजित पवार यांच्या सूचनेवरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हापरिषद बीड श्रीकांत कुलकर्णी यांनी दि.२६ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी १०:३० वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ जिल्हापरिषद बीड यांना मौजे. पोखरी (घाट)ता.जि.बीड येथील शाळेस भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले असून प्रतिलिपी मध्ये कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा जिल्हापरिषद बीड तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बीड तसेच सरपंच व अध्यक्ष शाळाव्यावस्थापन समिती यांना लेखी कळविण्यात आले असून एकंदरीतच लवकरच पोखरी (घाट)येथील ग्रामस्थांना उर्वरीत शाळा बांधकामासाठी निधी मिळण्याची चिन्हे दिसुन येत आहेत.
पोखरी (घाट)येथील ऊसतोड मजूरांनी लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून बांधलेल्या ज्ञानमंदिर म्हणजेच जिल्हापरिषद शाळेचे वृत्त ठळक प्रसिद्ध केल्यामुळे जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी तत्परतेने बैठक आयोजित करून निधी देण्यात पुढाकार घेतला त्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचे आभार.