श्रीरामपूर मध्ये रेल्वे अपघातात प्रसाद कदम यांचे निधन
टाकळीभान येथील प्रसाद लक्ष्मण कदम (वय ४४) यांचे नुकतेच वाकडी रोड धनगरवाडी रेल्वे चौकी जवळ रेल्वे अपघातात निधन झाले आहे. प्रसाद हे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असल्याने अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने टाकळीभान व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. लक्ष्मण कदम (गुरुजी) यांचे ते चिरंजीव तर क्रीडा शिक्षक अजित कदम यांचे ते बंधू होत. प्रसाद कदम हे नेवासा प्राथमिक शिक्षक बँकेचे कर्मचारी होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा