कोळाईदेवी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार…
कोळाईदेवी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार…
कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे गेल्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षा व त्यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांच्या समवेत विद्यालयाच्या वतीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सत्कार झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावी मधील बोर्ड परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थी कु. निंभोरे श्वेता अविनाश, कु. हराळ ऋतुजा सुभाष, कु. बांदल एकता ज्ञानदेव, इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत कला शाखेमधील कु. भापकर कल्याणी सुरेश, कु. लगड साक्षी प्रवीण, कु. जगताप आकांक्षा आप्पासाहेब, तर विज्ञान शाखेतील कु. नलगे निकिता विजय, पवार अश्विनी अनिल, वेठेकर नम्रता अशोक या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.
याशिवाय एन एन एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेले तीन विद्यार्थी, सारथी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेले सहा विद्यार्थी, चित्रकला परीक्षेतील एलिमेंटरी ग्रेड परीक्षा मधील ए ग्रेड मिळालेले नऊ विद्यार्थी, बी ग्रेड मिळालेले 15 विद्यार्थी, सी ग्रेड मिळालेला एक विद्यार्थी, तसेच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये यशस्वी झालेले चार विद्यार्थी, इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये यशस्वी झालेले दोन विद्यार्थी, इयत्ता चौथी मध्ये मंथन परीक्षेत यशस्वी झालेले सहा विद्यार्थी या सर्वांचा सत्कार मोठ्या उत्साहाने करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, प्राथमिक शिक्षक जिल्हा बँकेचे चेअरमन अविनाश निंभोरे ,सरपंच अमोल काळे, उपसरपंच नितीन मोहरे, माजी उपसरपंच अमित लगड, नितीन नलगे, ग्रामपंचायत सदस्य मिटू शिरसाट, विद्यालयाचे प्राचार्य दांगडे एच के, उपप्राचार्य जंगले एस आर, केंद्रप्रमुख ,तसेच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक दादा नलगे, विजय लगड, योगेश चंदन ,गणेश गाडेकर तसेच इतर पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळे एस आर तर सूत्रसंचालन धीवर मॅडम यांनी केले.