
*अंत्ययात्रा सुरू झाली..अचानक तिरडी हलू लागली.. अन् तरुण तिरडी वर उठून बसला*!
अंत्ययात्रा सुरू झाली..अचानक तिरडी हलू लागली.. अन् तरुण तिरडी वर उठून बसला!
अकोल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.तिरडी बांधली शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना अचानक हा तरुण तिरडीवर उठून बसल्याची धक्कादायक घटना पातुर तालुक्यातील विवरा गावात घडली
मयत झालेल्या तरुणाच नाव प्रशांत मेसरे असं नाव होतं. 21 वर्षीय प्रशांत मेसरे याचं निधन झालं. प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता.गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. 25 वर्षांच्या प्रशांतच्या मृत्यूचा धक्का पचवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती.त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करून त्याला स्मशानभूमीत घेऊन जाऊ लागले.दरम्यान अंत्ययात्रा सुरू असताना तरुणांमध्ये अचानक हालचाल जाणवली त्यामुळे अंत्ययात्रा थांबवण्यात आली. तिरडी खाली ठेवताच आश्चर्याची गोष्ट घडली हा तरुण तिरडीवर उठून बसला. हा प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून या तरुणावर काळी जादू केली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. प्रशांतचा मृत्यू झाला म्हणून मिस यु प्रशांत असे स्टेटस त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर ठेवले होते. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.