युवासेनेचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन –

युवासेनेचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन –
श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी यासाठी श्रीरामपूर तालुका युवासेनेच्या वतीने महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बबलू वाघुले, रणजित कोकणे, विनोद रणनवरे आदी उपस्थित होते.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. श्रीरामपूर तालुक्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मका इ.पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असून ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचे निवेदन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना युवासेनेच्या वतीने देण्यात आले आहे.