टाकळीभान येथे मयुर पटारे युवा मंचच्या वतीने दिवाळी निमित तीन दिवसीय दीपोत्सव साजरा.

टाकळीभान येथे मयुर पटारे युवा मंचच्या वतीने दिवाळी निमित तीन दिवसीय दीपोत्सव साजरा.
-अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा लावण्यासाठी मारुती मंदिर, टाकळीभान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव सोहळा आज अनेक युवकांच्या उपस्थितीत पार पडला. जय हनुमान तरुण मंडळ व लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. पूजेचे मानकरी जय हनुमान तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांच्या हस्ते पूजन पार पडले.
दुसऱ्या दिवशीचा दिवा देशासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या भारतीय जवानांना शुभेच्छा देण्यासाठी तर तिसऱ्या दिवशीचा दिवा हा जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजासाठी लावण्यात आला. या सोहळ्यात गावातील अनेक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नेत्रदीपक दीपोत्सव सोहळा पार पडला.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो आणि खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटलं अशी भावना मयुर पटारे यांनी व्यक्त केली.
हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पंकज परदेशी, मंगेश पटारे, कुलदीप परदेशी, अजय दुधाळे, सागर पटारे, प्रतीक मगर, जयदीप परदेशी, गौरव पटारे, सुशांत नवले आदींनी परिश्रम घेतले.