लोकसंघर्ष पक्षाकडून उच्चशिक्षित तरुणांना विधानसभेची संधी ,राहुरी मधून संदीप चोरमले यांना उमेदवारी.
लोकसंघर्ष पक्षाकडून दुसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये पक्षाकडून उच्चशिक्षित ग्रामीण भाग तिळापुर येथील संदीप सोपान चोरमले यांचे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाले व पुढील अभ्यास करत असलेले तरुण नेतृत्व पुणे येथील खासदारकीसाठी उमेदवारी करून अपक्षांमध्ये अव्वल स्थानी राहिले असल्याने लोकसंघर्ष पक्षाकडून त्यांना 223 राहुरी अहिल्यानगर साठी त्यांची निवड करून दुसऱ्या यादीत त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यातच विविध पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर झाले. त्याचा सध्या घराणेशाही किंवा अगोदर विधानसभेला उमेदवारी मिळालेल्या लोकांनाच प्रमुख पक्षाने उमेदवारी दिल्या त्यातच नवीन पक्षाने देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याचे ठरवलेले असल्याने राहुरी विधानसभेसाठी लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी कायद्याच्या माहिती असणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांना लोकसंघर्ष पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली
सध्याच्या राजकारणाची परिस्थिती बघता उच्चशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, ही राजकारणाची गरज बघता सुसंस्कृत,उच्चशिक्षित, प्रामाणिक, व कष्टाळू युवकांना संधी दिली असे लोकसंघर्ष पक्षाचेअध्यक्ष योगेश माखने यांनी यावेळी मत व्यक्त केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा