राहुरी, अहिल्यानगर,शेवगाव,नेवासा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा- नानासाहेब जुंधारे
राहुरी, अहिल्यानगर,शेवगाव,नेवासा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा- नानासाहेब जुंधारे
तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या कपाशी रुपी घास हिरावून गेलेला आहे. दिवाळी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने व शेतीशी नाळ जोडलेले नानासाहेब जुंधारे यांनी सांगितले की ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ज्यावर माझ्या शेतकरी राजाची दिवाळी होणार त्याच कापूस पिकावर परतीच्या पावसाचे सावट पडल्याने माझा शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. कापूस वेचणी करून दोन पैसे हातात येतील दिवाळी कुटुंब सोबत आनंदाने साजरी करता येईल या आशेने शेतकरी असताना परतीच्या पावसाने यावर विरजण टाकले आहे. तरी तहसीलदार यांनी यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून मंडल अधिकारी व तलाठी यांना आदेश देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे. तसेच शेतकऱ्यांनी एक रुपयात शासनाच्या योजनेतून पिकांचे विमे उतरवलेले आहे. त्या कंपनीच्या टोल फ्री नंबर वर कॉल करून अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या असताना देखील कंपनीचे प्रतिनिधी अद्यापही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुसकानी बघण्यासाठी आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासकीय यंत्रणेने ज्या कंपनीशी करार झालेला आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी. अशी व्यवस्था करावी तरच शेतकऱ्यांची दिवाळी होईल.
एकीकडे विधानसभेचे बिगुल वाजलेले आहे.सध्या दिवाळीची धामधूम असताना विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला आहे. याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा पुळका असणारे गायब झाले आहे. शेतकऱ्यांबाबतीत शासकीय स्तरावर काय कार्यवाही होते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.