जबरी चोरी करणाऱ्या महिलेस अटक

जबरी चोरी करणाऱ्या महिलेस अटक
राहुरी बस स्टॅन्ड येथे चोरी झालेले अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
आज दिनांक 21 10 2024 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहुरी बस स्टॅन्ड येथे मनोज हिरामण खरात राहणार राहुरी हे श्रीरामपूर येथे जाण्यासाठी राहुरी बस स्टँड समोरून बस स्टँड कडे जात असताना तेथे उभे असलेल्या तीन महिलांपैकी एका महिलेने बळजबरीने त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी सदर महिलेस फिर्यादी चे आई व पत्नीने सदर महिलेला पकडले असता त्यांना ढकलून देऊन बळजबरीने पाहिजे काढून घेऊन निघून गेली म्हणून बस स्टॅन्ड वरील पोलिसांच्या खबऱ्याने राहुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने राहुरी पोलिसांनी सदर आरोपी महिलेस पकडून पोलीस स्टेशन येथे आणले असता तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव पूनम अशोक बर्डे राहणार मोरे चिंचोली, तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले व तिची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्राची मागणी केली असता आधार कार्ड जळालेले आहे असे सांगून बनवाबनवी चा प्रयत्न केला.
सदर घटनेबाबत फिर्यादी मनोज हिरामण खरात यांनी फिर्यादील्याने आरोपी महिलेविरुद्ध भारतीय आणि संहिता कलम 309 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिलेस अटक करून शासकीय पंचा समक्ष तिचे अंग झडतीत चोरलेले एक हजार रुपये मिळाल्याने जप्त करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोडके करत आहे.
सदर महिलेने यापूर्वीही राहुरी येथे गुन्हा केलेले असल्याची खात्री करून तिला अन्य गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे, सहाय्यक फौजदार अंबादास गीते, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, संदीप ठाणगे, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख , सतिष कुऱ्हाडे ,गोवर्धन कदम, अंकुश भोसले यांच्या पथकाने केलेली आहे.