वारंवार अल्प कालावधीमध्ये प्राचार्यांच्या बदल्यामुळे टाकळीभान शाळेचे शैक्षणिक वातावरण विस्कळीत..
वारंवार अल्प कालावधीमध्ये प्राचार्यांच्या बदल्यामुळे टाकळीभान शाळेचे शैक्षणिक वातावरण विस्कळीत..
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गोरगरीब दीनदलित सर्वसामान्यांची मुले घडवीत या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, या संस्थेची टाकळीभान येथे शाखा आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम घडून येथे शिक्षणाचे बाळकडू घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वी होऊनout of देश-विदेशात आहेत.
असा उत्तम दर्जेदार वारसा या संस्थेला, शाखेला आहे, परंतु टाकळीभान येथे गेल्या तीन चार वर्षांपासून तीन-चार प्राचार्यांच्या बदल्या एक वर्षाच्या पुढे कार्यकाल जाऊ न देता होत आहेत. दरवर्षी शाखेला नवीन प्राचार्य याचे गौडबंगाल काय ?असा एकच प्रश्न पालक ग्रामस्थ यांना पडला आहे. नवीन प्राचार्य आल्यानंतर शालेय कामकाजाची माहिती होत नाही तोच, व पुढे शाळेच्या विकास व प्रगतीसाठी त्यांनी पावले उचलली तोपर्यंत त्यांची बदली झालेली असते, यामुळे त्या प्राचार्यांना पाहिजे तशी प्रगती व शाखेचा विकास करता येणे शक्य नाही.
शाखेची पूर्ण माहिती होऊन येथील प्रश्न अडचणी, विविध विकास कामे याकरिता किमान तीन-चार वर्ष चांगल्या अनुभवी प्राचार्यांची या शाखेला आवश्यकता आहे, तरच शाखेची प्रगती व विकास व्यवस्थित होऊ शकतो, याबाबत शाखेने,(school ) स्कूल कमिटी व संस्थेने विचार करावा अशी खंत सुज्ञ ग्रामस्थ शाळेचे पालक यांनी केली आहे. यामुळे शाखेची प्रगती खुंटून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक वातावरण यामध्ये विस्कळीतपणा येत आहे.
टाकळीभान ही मोठी शैक्षणिक शाखा असल्याने येथे चांगल्या अनुभवी प्राचार्यांची आवश्यकता आहे. याची दखल घ्यावी व प्राचार्य यांनी किमान तीन-चार वर्ष शाखेत सेवा देतील असा निर्णय कमिटी ने व संस्थेने घ्यावा तरच शाखेची प्रगती व विकास होऊन चांगले दिवस येतील अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थ, पालक शिक्षण प्रेमी यामधून होत आहे.