इंद्रायणी नदीवर जीव धोक्यात घालून जीवाशी खेळण्याचा प्रयत्न*
*इंद्रायणी नदीवर जीव धोक्यात घालून जीवाशी खेळण्याचा प्रयत्न*
महाराष्ट्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे. सगळीकडेच नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले त्याचबरोबर मुंबईतील मोठी संततधार चालू आहे या स्थितीमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे कधी पाणी वाढते आहे तर कधी उतरत आहे. अशा परिस्थितीमध्ये आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदीवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. आळंदी इंद्रायणी नदीला महापुराची स्थिती प्राप्त झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असून आळंदीतील भक्ती सोपान पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.मात्र या पाण्यातून सुद्धा नदी ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर नागरिक करताना दिसत आहेत. अचानक पाण्याची पातळी वाढली किंवा पाय घसरून तोल गेला तर जीवित हानी होऊ शकते.आणि जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस प्रशासन यांनी वेळीच दखल घेत सदर भक्ती सोपान पुलावरून नदी ओलांडून जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करावे. आणि सदर जिवाशी खेळण्याचा प्रयत्न प्रतिबंध करत थांबवावा. अशी विनंती फोटोग्राफर विठ्ठल शिंदे यांनी प्रसिद्धी दिलेल्या चित्रकरणा मार्फत केली आहे. सदर बाबत प्रशासनाने दखल घ्यावी आणि पुढील धोकादायक स्थिती टाळावी.
आळंदी पोलिसांनी त्वरित दखल घेतली आहे पुढील कारवाईसाठी नगरपरिषदेची संपर्क केला आहे काही वेळातच नगर परिषदेचे लोक आणि पोलीस कर्मचारी येथे जाऊन भक्ती सोपान फुल रहदारीसाठी बंद करणार असल्याची माहिती मिळत आहे