आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता
टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने वृक्षदिंडी…
टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने वृक्षदिंडी…न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पा. जुनियर कॉलेज यांच्या वतीने 22 जुलै रोजी निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्ष दिंडी काढून पर्यावरणाचा अनोखा संदेश देण्यात आला. दिवसेंदिवस पर्यावरणाचे महत्त्व वाढत आहे. व त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे या उद्देशातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. मिरवणुकीच्या रथामध्ये वृक्ष रोपे ठेवून, फुल फांद्यांनी रथ सजविला होता. दिंडीमध्ये गावातील भजनी टाळकरी मंडळी तसेच विद्यार्थी डोक्यावर वृक्षरोपाच्या कुंड्या, तुळशी कलश घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. या दिंडीचे ग्रामस्थ व पर्यावरण मंडळाच्या वतीने स्वागत करून कर्मवीर अण्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, रयतचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, विलास दाभाडे प्राचार्य बी टी इंगळे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अर्जुन राऊत,श्रीधर गाडे,सुभाष येवले, शिक्षक वृंद व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate this post