श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे राज्यात चांगले काम सुरू… आ. शरद सोनवणे

श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे राज्यात चांगले काम सुरू… आ. शरद सोनवणे
टाकळीभान प्रतिनिधी – श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे राज्यात कामगारांच्या हिताचे चांगले काम सुरू असून या संघटनेकडून कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद वाटतो असे प्रतिपादन आ. शरद सोनवणे यांनी श्रीराम बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जुन्नर जि. पुणे येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती व पुणे जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी मान्यवर म्हणून जुन्नर तालुक्याचे आ. शरददादा सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष सुरजदादा वाजंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नूतन पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा कार्यकारणी मध्ये पुणे जिल्हाध्यक्ष पदी नवनाथ परदेशी , उपाध्यक्षपदी विकास परदेशी यांची निवड करण्यात आली.
यावेळी श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ छल्लारे यांनी उपस्थीत असंघटीत बांधकाम कामगार यांना संघटनेबाबत व संघटनेच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. मा.आ. भानुदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गद्शनाखाली कामगाराना नोदणी पासून ते सर्व योजनेच्या लाभ लाभार्थ्यांना मिळे पर्यंत येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जाईल तसेच जुन्नर तालुक्यातील गोर गरीब कामगारांना पूर्ण ताकदीने सहकार्य करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल असे आश्वासन छल्लारे यांनी दिले. कुटुंबाची सेवा जशी निस्वार्थी केली जाते तशी येथील कामगारांच्या कल्याणासाठी निस्वार्थ सेवा करू असे सूरज दादा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले,
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटनाचे सचिव दीपक नवगिरे, संदीप कांबळे, सागर अमोलीक, हृषिकेश भाऊ आदीसह संघटनेचे पदाधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.