रुद्रा न्यूज चे संपादक एन डी चोरमले यांच्या तिळापुर मेन रोडच्या तक्रारीची नामदार विखे पाटील यांच्याकडून दखल.
रुद्रा न्यूज चे संपादक एन डी चोरमले यांच्या तिळापुर मेन रोडच्या तक्रारीची नामदार विखे पाटील यांच्याकडून दखल.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील तिळापुर येथील महाडिक सेंटर ते तिळापुर रस्त्याचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात केली होती बोरी फाट्या पर्यंत काम देखील झाले परंतु तिळापुर फाटा ते तिळापुर गावात जाणारा मेन रस्ता ठेकेदाराने काम करण्याच्या उद्देशाने खोदून ठेवला गेला पाच वर्षापासून काम अपूर्ण होते सार्वजनिक विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
सार्वजनिक विभाग अधिकारी कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांनी गेली पाच वर्षापासून काम अपूर्ण व खोदून ठेवलेले असल्याने ग्रामस्थ व शाळातील मुला मुलींना तारेवरची कसरत करावी लागत होती.
म्हणून रुद्रा न्यूज संपादक नारायण चोरमले यांनी श्रीरामपूर पंचायत समिती माजी सभापती व श्रीरामपूर भाजपा तालुका अध्यक्ष श्री दीपक अण्णा पटारे यांना सर्व हकीगत सांगून काम मार्गी लावण्याची विनंती केली असता त्यांनी 30 तारखेला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री ना विखे पाटील हे जनता दरबार घेण्यासाठी श्रीरामपूर येथे येणार आहेत आपण त्यांच्याशी रस्त्या संदर्भात बोलुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
तसे झाले देखील याच रोडच्या प्रश्नासंदर्भात नामदार विखे पाटील यांना दिनांक 30 7 2023 रोजी श्रीरामपूर येथे जनता दरबार होऊन त्यामध्ये रुद्रा न्यूज संपादक नारायण चोरमले यांनी लेखी तक्रार नामदार यांच्यासमोर मांडली त्याबद्दल त्यांनी लागलीच प्रश्न मार्गी लावले. दिलेल्या अर्जावर एक आठ 2023 रोजी रस्त्याचे काम चालू झाले चार ते पाच दिवसांमध्ये एक लेयर अपूर्ण असून बाकी काम पूर्ण देखील झाले.
त्याबद्दल तिळापुर ग्रामस्थ तसेच विशेष रुद्रा न्यूज परिवाराकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली म्हणून त्यांचे आभार तसेच त्यांना तिळापुर गावाला भेट देण्यासाठी विनंती देखील केलेली आहे जसे रस्त्याचे काम मार्गी लावले तसेच तिळापुर गावाच्या समस्या जास्त असल्याने नामदार साहेबांनी तिळापुर गावाला भेट द्यावी अशी विनंती देखील रुद्रा न्यूज परिवाराकडून केली आहे