नाशिक येथे सुप्रसिद्ध लेखिका रंजना सानप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
*नाशिक येथे सुप्रसिद्ध लेखिका रंजना सानप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
नाशिक येथे संपन्न झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय वंजारी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, कथाकार ,कादंबरीकार रंजना सानप,मायणी यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे दिनांक 25 डिसेंबर 2022 रविवार रोजी वंजारी महासंघ साहित्य आघाडीच्या वतीने वंजारी समाजाचे पहिले एकदिवशीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.हे संमेलन पार पाडण्यासाठी आघाडीचे संस्थापक मा. गणेश खाडे, स्वागताध्यक्ष मा. प्रशांत आंधळे यांनी खूप कष्ट घेतले. या संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक खानदेश रत्न प्राध्यापक वा .ना. आंधळे हे अध्यक्ष तर सुप्रसिद्ध ज्येष्ठ कादंबरीकार कथाकार कवी विदर्भ रत्न श्री बाबाराव मुसळे हे उद्घाटक म्हणून लाभले होते. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन आधी कार्यक्रम आणि मान्यवर साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात रंजना सानप यांनी जेष्ठ साहित्यीक मा. डॉ.भास्कर बडे,लातूर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन केले.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.