धार्मिकमहाराष्ट्र
विर भाई कोतवाल पुण्यतिथी उत्सवात साजरी

विर भाई कोतवाल पुण्यतिथी उत्सवात साजरी
*भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी*
बेलापूर (वार्ताहर) येथील नाभिक समाज संघटनेच्या वतीने शहीद भाई वीर कोतवाल यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. वीर भाई कोतवाल चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रवींद्र खटोड, सुधीर नवले, शरद नवले, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात , वैभव कु-हे, पुरुषोत्तम भराटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे स्थानिक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सुनिल सोनवणे, गोरक्षनाथ कणसे, रमेश कुटे, विजय हुडे,नंदु भागवत,सागर हुडे, सतीश सोनवणे, विजय शेजूळ, निलेश हुडे, कृष्णा भागवत, योगेश बोरसे, नवीन भागवत, गणेश कणसे, आनंद वैदय, बबनराव रावताळे आदींनी परिश्रम घेतले.