ब्रेकिंग

प्रशासनाच्या आशीर्वादाने राहुरीत वाळु माफियांचा धुमाकूळ

प्रशासनाच्या आशीर्वादाने राहुरीत वाळु माफियांचा धुमाकूळ

 

राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रात बेकायदेशीर वाळु उपसा प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाचा महसूल बुडवुन चोरटी वाळू वाहतूक चालु आहे. यातुन नदीकाठच्या शेतकर्यांना दमदाटी व हाणामार्या करुन दहशत निर्माण केली जात आहे. या बेकायदेशीर वाळू उपसाविरोधात क्रांतीसेना, नदीकाठचे शेतकरी व ग्रामस्थांनी वाळू उपसा बंद करून या माफियांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, ७ जानेवारी २०२२
रोजी मुळा नदी काठचे शेतकरी यशवंत प्रभाकर म्हसे यांना सकाळी ८:३० वा. वाळु माफियांकडुन मारहाण करण्यात आली. दिवसाढवळ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना हे वाळु माफिया दमदाटी करून मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. या वाळु माफियांना कोणाचा पाठिंबा आहे ? हा प्रश्न दहशतीत असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना पडला आहे.

या अगोदर वेळोवेळी अवैध वाळु उपशाबाबत तोंडी व व्हाट्सअप द्वारे राहुरीचे तहसीलदार यांना माहिती दिली होती. परंतु वाळू चोरी करणा-या माफियांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. वाळु चोर नदी काठच्या शेतक-यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देतात. तसेच मागील महिन्यात नदीकाठ परिसरात याच प्रकारे शेतकऱ्यांना दमबाजी करून मारहाण करण्यात आली आहे. अशा प्रकारे हे वाळु चोर दिवसा ढवळया ग्रामस्थ व शेतक-यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच तुम्ही आमची वाळु बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करू. तुम्हाला जेलमध्ये घालु अशी धमकी दिली जाते. त्यामुळे नदिकाठचे शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या वाळु चोरांमध्ये एवढी हिंमत कुणामुळे निर्माण झाली आहे, त्यांना कोणाचा वरद हस्त आहेत की ज्यामुळे वाळु चोर नदी काठच्या शेतक-यांना, ग्रामस्थांना, गोरगरीब जनतेस वेठीस धरत आहेत, धमक्या देत आहे. यातुन राहुरी तालुक्यात अशी चर्चा आहे की, महसूल व पोलीस विभागाला रसद पुरवली जात असल्याने अशा घटनेत वाढ झाली आहे. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाला या अवैध वाळू उपसा मुळे गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. यातुन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तिव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी प्रभाकर म्हसे, इंद्रभान पेरणे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, नंदकुमार तनपुरे, यशवंत म्हसे, मच्छिंद्र म्हसे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी व राहुरी तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहेत.

 

राहुरी तालुका

अशोक मंडलिक

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे