फरार व पाहिजे असलेले 108 आरोपी पकडून उत्कृष्ट कामगिरी
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कारवाई फरार व पाहिजे असलेलेआरोपी केले जेरबंद पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून ज्ञानेश्वर शिंदे यांचा प्रशस्ती पत्र देऊन केला गौरव
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत फरार व पाहिजे असलेले 108 आरोपी पकडून उत्कृष्ट कामगिरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस नाईक संदीप पवार, पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी विशेष कामगिरी करून पोलीस दलाची मान उंचावली आहे अशी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब यांच्याकडून पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये अनेक सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अनेक गुन्ह्याचा उलगडा होईल व जिल्ह्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण श्री अजित पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनील कटके साहेब इत्यादी उपस्थित होते
या कामगिरी पोलीस दलाची मान उंचावली असून ज्ञानेश्वर शिंदेLCB, यांना नाथपंथी डवरी गोसावी समाज नेवासा तालुका यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या