बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत भारतीय राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिकदादा कदम होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, निलेश कोकरे, संजय मुंगसे, विजय चेडे, साहेबराव कदम, अशोक औटी, राजू एडके, शंकर लाड, उत्तम तांबे, भैय्या पठाण, पठाण हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.