ब्रेकिंग
अचानक छपराला आग लागून संसार भस्मसात….

टाकळीभान येथे अचानक छपराला आग लागून संसार भस्मसात….
टाकळीभान येथील पेत्रस गवळीराम रणनवरे व त्यांचा मुलगा अरुण पेत्रस रणनवरे हे नेवासा रोड कॅनॉल लगत राहत असून त्याच्या राहत्या छपराच्या घराला दि. 25 फेब्रु. शुक्रवार रोजी दुपारी साडेबारा च्या दरम्यान अचानक आग लागल्याने या छपरातील गॅस टाकीचा स्फोट होऊन या आगीत रणनवरे यांचा पूर्ण संसार भस्मसात झाला, छपरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, भांडीकुंडी, अन्नधान्य आदी जळून खाक झाले आहे. त्यामुळे पेत्रस व त्यांचा मुलगा अरुण रणनवरे यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कशामुळे आग लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही