कृषीवार्ताब्रेकिंग
महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी
*महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी
घोडेगाव येथे भटक्या विमुक्त आदिवासी ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महात्मा फुले बालसंगोपन केंद्रची स्थापना केली असून या संस्थेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात असाच कार्यक्रम घोडेगाव ता.नेवासा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव घोडेगाव यांच्यावतीने अनाथ निराधार मुलांना अन्नदान करण्यात आले सदरील कार्यक्रमास युवा नेते रवी भाऊ आल्हाट राजेंद्र ठुबे विशाल वैरागर तुषार वैरागर आकाश चांदणे अनिकेत वैरागर आदी मान्यवर उपस्थित होते.