जीएसटीचे नवे सहायक राज्यकर आयुक्त भिसे यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार
जीएसटीचे नवे सहायक राज्यकर आयुक्त भिसे यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा एक सामाईक अप्रत्यक्ष कर आहे, जो केंद्र आणि राज्यांकडून वसूल होणारे अप्रत्यक्ष कर जसे की व्हॅट, सेनवॅट आणि इतरांच्या बदल्यात त्या सर्वांचे एकत्रीकरण करून आणला गेला आहे. जीएसटी लहान किंवा मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतो. या कार्यालयात नव्याने रुजू झालेले सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे हे उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केला.
वस्तू व सेवा कर भवनचे नवे सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मारुतीराव मिसळवालेचे संचालक अमित खामकर, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते. भिसे यांचा शाल, वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भिसे म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करू.