अ. नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पांडुरंग रायते याच्या निवडीचे स्वागत.
अ. नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पांडुरंग रायते याच्या निवडीचे स्वागत.
परभणी (पाथरी )येथे पाच हजार शेतकऱ्याच्या उपस्थितीत दोन साखर व इथेनॉल कारखान्यातील पंचवीस किमी हवाई अंतराची अट रद्द करणे, सातबारा उताऱ्यावर असलेले सर्व कर्ज माफ करणे, शेतमालावरील निर्यात बंद्या उठविणे आदी शेतकरी हिताच्या मागण्याचे ठराव संमत करण्यात आले. प्रसंगी रघुनाथदादा पाटील राज्य अध्यक्ष व ऍड अजित काळे राज्य उपाध्यक्ष, कालिदास आपेट यांच्या हस्ते पांडुरंग रायते याची पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली. या प्रसंगी कार्याध्यक्ष, क्रांतीसिह नानापाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले, विदर्भप्रमुख धनंजय काकडे, अनिल औताडे जिल्ह्ध्यक्ष अ. नगर युवराज जगताप , शरद पवार, शिवाजी जवरे कडू पवार दादा पवार आदी पदाधिकारी नगर जिल्ह्यतून परिषदेला हजर होते. आज झालेल्या श्रीरामपूर येथील बैठकीत प्रमुख उपस्थितीत ऍड अजित काळे, राज्य उपाध्यक्ष हे होते.पांडुरंग रायते याच्या निवडीने अ. नगर जिल्ह्यात शेतकर्यांमध्ये उस्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने श्री रायते याचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीस रुपेंद्र काले राज्य सचिव, जिल्हाध्यक्ष रु अनिल औताडे, श्रीरामपूर ता. अध्यक्ष युवराज जगताप, नेवासा ता. अध्यक्ष हरिभाऊ, शरद पवार,,इंद्रभान चोरमल स्वाभिमानीचे जितेंद्र भोसले, भरत असणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत बँकेची थकलेली कर्जे व थकबाकी संदर्भात बँका करत असलेली न्यायालयीन दावे, जिल्हा बँका नाकारत असलेले शेतकऱ्याचे पिक कर्ज, अकारीप डीक शेतकऱ्याचे प्रश्नासह विविध प्रश्नावर चर्च्या झाली. या प्रसंगी तालुक्यातील अनेक शेतकऱयांनी ऍड अजित काळे याच्या हस्ते संघटनेचे बॅच छातीला लावून संघटनेत प्रवेश केला. यामध्ये डॉ. दादासाहेब आदिक यांची पशुवैद्यकीय शेतकरी संघटना अ. नगर जिल्हाध्यक्ष पदी निवड तर डॉ. नवले याची श्रीरामपूर ता. पशुवैद्यकीय शेतकरी संघटना अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्याचबरोबर माजी संचालक साहेबराव चोरमल, अकबर शेख, शुभानंद भोसले, अमोल म्हस्के, बाबासाहेब आदिक, राजेंद्र गायकवाड, दादासाहेब श. आदिक, गणेश आदिक, डॉ उचित आदी खानापूर गावच्या व अभिजित बोर्डे, बाबासाहेब तुपे, बाळासाहेब बोर्डे, अच्युतराव बोर्डे सोपानराव वाणी या मातुलठाणच्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेत सक्रिय प्रवेश केला. ज्ञानेश्वर आदिक आदित्यं आदिक नारायण आदिक वाल्मिक आदिक रमेश आदिक अशोक जगताप योगेश आदिक आदी शेतकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.