मानोरीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार; परिसरात बिबट्याची दहशत
मानोरीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार परिसरात बिबट्याची दहशत
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गणपत वाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन
शेळ्या ठार झाल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट पसरली असून वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे गणपतवाडी शिवारातील आप्पासाहेब गोपीनाथ तनपुरे यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर रात्री बाराच्या दरम्यान बिबट्याने हल्ला चढवला एक शेळी उसाच्या शेतात ओढून नेली तर एक शेळी जखमी केली असून त्यातच या दोन्ही
शेळ्या ठार झाल्याची घटना घडली सकाळी साडेदहाच्या दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला तसेच राहुरी मांजरी रोड नजीक पोपटराव पोटे यांच्या वस्तीवर देखील बिबट्याचे दर्शन झाले साळुंखे वस्ती येथील मुरलीधर साळुंखे व तसेच माजी उपसरपंच सुनील पोटे पोटे वस्ती या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे