परिवर्तन महाशक्ती या तिस-या आघाडीत लोकसंघर्ष पक्ष सामील

परिवर्तन महाशक्ती या तिस-या आघाडीत लोकसंघर्ष पक्ष सामील
परिवर्तन महाशक्ती या तिस-या आघाडीचा पहिला कार्यकर्ता मेळावा काल दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. त्याला लोकसंघर्ष पक्षातर्फे अध्यक्ष अॅड.योगेश माकणे, विद्यापीठ प्रमुख श्री. संदीप चोरमले व इतर सदस्य उपस्थित होते.
पक्षाचे अध्यक्ष अॅड.योगेश माकणे यांनी पक्षाची ध्येय धोरणे सांगताना भविष्य काळातील येणा-या पिढीला कसा आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा सामान करावा लागणार असून त्यामुळे ड्रायव्हर, शिक्षक, नर्स इ नोक-या कश्याप्रकारे नाहीश्या होणार आहेत हे सांगितले.
तसेच मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेल्या पुतळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणाच्या राजहट्टामुळे दोन महिन्यांत पुतळा बसविण्यात आला आणि असाच राजहट्ट महिलांच्या सुरक्षिततेसाठी का करत नाहीत, असाच राजहट्ट शेतीतील रासायनिक खते वापर बंदीसाठी का करत नाहीत, माफक दरात आरोग्य सेवा व मोफल शिक्षणासाठी का करत नाही असा सवाल अॅड.योगेश माकणे यांनी उपस्थित केला.