सरकारी दप्तरी सर्वसामान्य जनतेचे कामे त्वरीत मार्गी लागावेत म्हणून शासनाने केलेले कायदे पायदळी तुडवायचे आणि दिखावा म्हणून कार्यालयात संविधान दिन साजरा करायचा हा संविधानाचा अपमान- अमित मुथा
सरकारी दप्तरी सर्वसामान्य जनतेचे कामे त्वरीत मार्गी लागावेत म्हणून शासनाने केलेले कायदे पायदळी तुडवायचे आणि दिखावा म्हणून कार्यालयात संविधान दिन साजरा करायचा हा संविधानाचा अपमान- अमित मुथा
सरकारी दप्तरी सर्वसामान्य जनतेचे कामे त्वरीत मार्गी लागावेत म्हणून शासनाने केलेले कायदे पायदळी तुडवायचे आणि दिखावा म्हणून कार्यालयात संविधान दिन साजरा करायचा हा संविधानाचा अपमान असल्याचे परखड मत सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अमित मुथ यांनी व्यक्त केले आहे.*
यासंदर्भाने अमित मुथा यांनी नागरिकांच्या कामांना सरकारी कार्यालयात होत असलेल्या विलंबनाबाबत व शासनाने केलेले कायदयांचे सरकारी कर्मचारी पालन करत नसलेबाबत थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्रव्यवहार करून भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची पंतप्रधान मोदींची संकल्पना शासकीय कायदयांचे कठोरतेने पालन केल्याशिवाय पूर्णत्वास येणार नसल्याचे मुथा यांनी पत्रात नमूद करून शासकीय कायदे कडक करण्याची मागणी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार तर केलाच जास्त कामाच्या ताणाने कर्मचाऱ्यांची काम करण्याची कार्यक्षमता कमी होऊ नये म्हणून आठवडा देखील पाच दिवसांचा केला.एव्हडे करूनही नागरिकांच्या शासकीय समस्या काही कमी झालेल्या नाहीत. अर्ज केल्यानंतर मुदतीतही लोकांना हेलपाटे मारल्याशिवाय कामेच होत नसतील तर दप्तर दिरंगाई,कर्तव्य कसुरी सारखे कायदे प्रभावीपणे पाळले जात नसल्याचे सिद्ध होत असल्याचे अमित मुथा यांनी पत्रात म्हंटले आहे.
संविधान दिन सर्वत्र आनंदाने साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.इतर शासकीय कार्यालयाबरोबरच श्रीरामपूर नगरपालिकेतही संविधान दिन साजरा करण्यात आला.कायदे पायदळी तुडवुनही अधिकारी संविधान दिन साजरा करून दिखावा करत असतील तर तो संविधानाचा देखील अपमान असल्याचे मुथा यांनी पत्रात शेवटी नमूद केले आहे.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.