गुन्हेगारी

वेश्या व्यवसाय प्रकरणी एकावर गुन्हा दाखल मरकळ रोडवरील हॉटेलवर पोलिसांचा छापा*

*आळंदीत वेश्या व्यवसाय प्रकरणी एकावर गुन्हा दाखल मरकळ रोडवरील हॉटेलवर पोलिसांचा छापा*

 

आळंदी वेश्याव्यवसाय प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव दिनेश जराप्पा पुजारी (सध्या राहणार आळंदी) असे आहे
केळगाव रोडवरील आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन महिलांची सुटका करणाऱ्या घटनेला काही कालावधी उलटलाही नाही तर आळंदीतील ही दुसरी घटना तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावाला काळिंबा फासणारी आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाने मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये वरील मरकळ रोडवरील आळंदी येथील मूनलाईट हॉटेल वर आळंदी पोलिसांकडून छापा मारण्यात आला सदर घटना मंगळवारी दिनांक 28 रोजी घडली. सदरील आरोपी दिनेश जरप्पा पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता तशी माहिती आळंदी पोलिसांकडून प्राप्त झालेली आहे आळंदी पोलिसांनी तात्काळ छापेमारी करत मुनलाइट हॉटेलवर घडणाऱ्या या अपप्रकारास आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई केली. तीर्थक्षेत्र आळंदी म्हणून आळंदी चे पावित्र्य राखले जावे यासाठी केलेले प्रयत्न हे पुण्य कर्म आहेत आणि ते होत नसतील तर आपण त्या पापात सहभागी का हा प्रश्न मोक्ष प्राप्तीसाठी नक्कीच विचारात घ्यायला हवा.

 

केळगाव येथे दोन महिलांची वेश्याव्य प्रकरणी सुटका त्यानंतर आळंदीतील मरक रोडवरील मूनलाइट हॉटेल वरील छापा या गोष्टी आळंदीचे स्वास्थ बिघडवणाऱ्या आहेत. आळंदीचं आलेलं बकल पण वाढती लोकसंख्या यासाठी प्रशासकीय वर्गा असणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा ही जंगल राजची सुरुवात तर नाही ना ? का त्याची नांदी ? हा एक निरुत्तरित प्रश्न उरून राहतो आहे. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई रेखा पुजारी यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये मरकळ रोडवरील मूनलाइट हॉटेल वरील आरोपी दिनेश जरा पपुजारी याचे विरोधात फिर्याद नोंदवले आहे आळंदी पोलीस स्टेशन अधिक चा तपास करत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे