सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सोनई येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*_
_*सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सोनई येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*_
सोनई, (15 ऑगस्ट) येथील सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सोनई या विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव कार्यक्रम पार पडला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता झाली. परिसरातील येथील प्रसिद्ध सैनिक श्री भारत कोकाटे मेजर आणि श्री संजय भोगे मेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण आणि देशभक्तीपर वेशभूषा या कार्यक्रमाने वेधले.दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या.प्रमुख पाहुणे असलेले श्री भरत कोकाटे मेजर यांनी स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच श्री.संजय भोगे यांनी बलिदान देणं म्हणजे नेमकं काय तसेच शाहिद होणे या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून समजावून सांगितला तसेच शाळेतील शिक्षक किसन पुंड, उर्मिला साळुंके, सविता जाधव,संध्या गायकवाड आणि बाळकुमार डमाळे यांनी भाषणातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे काय ते सांगितले
तसेच प्राचार्य सचिन चांडे यांनी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे भाषणातून स्पष्ट केले.संस्थापक श्री.किरण सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीच्या तन्मय ढगे आणि सिध्दी जाधव या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले केले व कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षीका प्रांजल दरंदले यांनी व्यक्त केले
विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या द्वारे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले.
आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील स्टाफ
श्री शरद सोनवणे सर , अर्चना दरंदले,गडाख स्वाती, बाराहते वंदना, कामक्षा दरंदले, भारती शेटे, प्रीती देशमाने, उषा आदमने, कल्पना शेटे, ,पल्लवी तनपुरे ,तोडमल सुवर्णा, कैतके स्वाती, निमसे सोनाली श्री.रोहित लहाड,सुजाता दरंदले,सुरेखा कर्जुले, यांनी विशेष परिश्रम घेतले.