कृषीवार्ताधार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र
टाकळीभान येथे जि. परिषद शाळेत निसर्ग पर्यावरण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण…

टाकळीभान येथे जि. परिषद शाळेत निसर्ग पर्यावरण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण…
टाकळीभान: टाकळीभान येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री अर्जुन राऊत या मार्फत वड, पिंपळ, लिंब, व सावली देणारी १० झाडे भेट देण्यात आली. यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गोकुळाष्टमी निमित्त राधाकृष्णची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री अर्जुन राऊत, माजी सरपंच बंडू तात्या पटारे, मुकुंद हापसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, बंडोपंत बोडखे, भाऊसाहेब कोकणे, शिवाजीराव जाधव, बापूसाहेब साळवे, शिंदे पा.,मुख्याध्यापक अनिल कडू, शिक्षक वृंद कुमार कानडे सर,शिवाजीराव पवार, विद्यार्थी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.