सागर बेग यांच्या वाढदिवसनिमित्त महाआरती गोशाळेला चारा दान.

सागर बेग यांच्या वाढदिवसनिमित्त महाआरती गोशाळेला चारा दान.
श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर येथे दि. २५ जून रोज़ी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भाऊ बेग यांच्या वाढदिवसा निमित्त सकल हिंदू समाज तसेच सर्व रामभक्त कार्यकर्ते यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात येऊन गोशाळेमध्ये गोवंशीय जनावरांना चारा दान करण्यात आला शिर्डीतील अनाथ आश्रमातील अनाथांना मिष्ठांन्न जेवण देण्यात आले.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठे कार्यक्रम व फ़्लेक्स बोर्ड यावर आनाठायी ख़र्च करु नये अशी विनंती सागर बेग यांनी केली होती. त्यास श्रीराम भक्तांनी प्रतिसाद देत अनेक अशा कार्यक्रमांना फाटा देऊन बेलापूर येथिल महेशजी व्यास यांच्या गोशाळेत जाऊन गोवंशीय जनावरांना चारा दान केला. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.*
दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच शहरातील,तालुक्यातील व इतर जिल्ह्यातीलही राष्ट्रीय श्रीराम संघाचे असंख्य कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली होती. त्यांचा योग्य असा पाहुणचार शहरातील कार्यकर्त्यांनी केला.दिवसभर ठिकठिकाणच्या शाखेच्या कार्यकर्त्यांच्या सत्काराला सागर बेग यांनी फाटा दिला. शिर्डी येथील अनाथ आश्रमातील अनाथांना सागरभाऊ बेग यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहाता तालुका अध्यक्ष मदनभाऊ मोकाटे यांनी जेवण दिले.सायंकाळी आयोजित हनुमान मंदिरातिल महाआरतीनंतर श्रीराम भक्तांसमोर मनोगत व्यक्त करताना आकाश बेग म्हणाले की, आम्ही श्रीरामपूर तालुका व परिसरात धर्म कार्यासाठी झिजण्याचे काम करत आहोत. कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी ही आमची लढाई नाही. तरीही काही राजकीय पक्षाचे पुढारी व नेते मंडळी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजन्यासाठी आमच्यावर टिकाटिप्पणी करण्याचे काम करत आहेत. वास्तविकपणे आमच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यापेक्षा त्यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील हिंदू समाज बांधवांसाठी काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे.केवळ कुठल्याही एका समाजाचे केवळ मतांच्या लाचारीसाठी लांगुलचालन करण्याचे काम त्यांनी करू नये.हिंदू धर्मरक्षण करणाऱ्यांवर केवळ व्यक्तिद्वेषापोटी जर कोणी टीका करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत यापुढे उत्तर दिले जाईल. मुळातच लोकप्रतिनिधीने असा आकस ठेवणे योग्य नाही.कोणत्याही एका समाजाची ग़ुलामगिरी त्यांनी करू नये.
हिंदू समाज आता जागृत होत चालेला आहे.कोणी त्याला रोखु शकत नाही.धर्मासाठी काम करणारे हे धर्मरक्षक व हिंदू समाज धर्मप्रेमी येणाऱ्या निवडणुकीत त्यांना नक्कीच आपली ताकद दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील,असा इशाराही आकाश बेग यांनी शेवटी दिला. हनुमान मंदिरामधे या महाआरतीमूळे राजकीय वातावरान ढवळून निघाले आहे.यावेळी महाआरतीला व शुभेच्छा देण्याकरिता शेकडोच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.संध्याकाळी झालेल्या महाआरती वेळेस हनुमान मंदिर परिसर जय श्रीराम, जय हनुमानच्या उद्घोषनेने दुमदुमून गेले महाआरती नंतर शहरातील धर्मरक्षकांनी ठेवलेल्या कार्यक्रमात सध्या देशात औरंगजेबाचे होत असलेल्या उदात्तीकरणाचा निषेध चाकूने केक कापुन व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या असंख्य धारकऱ्यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.



