अपघात

घोडेगाव येथे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांकडून ठेकेदारावर गुन्हा दाखल

घोडेगाव येथे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांकडून ठेकेदारावर गुन्हा दाखल

 

 

दि. ३१मार्च रोजी दुपारी ४.३७ वाजण्याच्या वाजता घोडेगाव येथील जलजिवन मिशन तलावात पोहण्यासाठी गेलेले प्रथमेश सुभाष काळे (वय. १७), जिवण रविंद्र आव्हाड, (वय. १७) शोयब अय्युब शेख (वय. १७) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता.

 

सदर तलावाचे बांधकाम दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू करण्यात आले होते. ते दि. ६ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते आज पर्यंत पुर्ण

 

होवू शकले नाही. तसेच तलावाचे बांधकाम चालू असताना मुळा उजवा कालव्याच्या पाण्याचा विसर्ग चालू असून त्याचे पाणी झिरपून तलावात येत असतांनाही त्यांनी कोणत्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे उपाय योजना केलेली नाही. तसेच तलावाच्या लगतच सोनई घोडेगाव, शिंगणापूर जाणारा वर्दळीचा रस्ता असून ठेकेदारांनी संरक्षण भिंत अगर कुंपण केलेले नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे सुचना फलक लावलेले नाही. किंवा सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली नाही. दि.३१ रोजी माझा

 

मुलगा व त्याचे दोन मित्र हे त्या जलजिवन मिशन तलावात बुडून मयत झाले होते.

 

या मृत्युस संबंधित ठेकेदार कारणीभूत आहे. दि. १० रोजी सोनई पोलीस ठाण्यात सुभाष वैजनाथ काळे (वय ४६) यांनी योगेश काशिनाथ हिंगणे रा. बारामती, के के थोरात रा. संगमनेर या ठेकेदाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे