मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करता उपसरपंच कानोबा खंडागळे व तीन सदस्याचे राजीनामे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करता उपसरपंच कानोबा खंडागळे व तीन सदस्याचे राजीनामे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करता उपसरपंच कानोबा खंडागळे व तीन सदस्याचे राजीनामे मराठा आरक्षण समितीकडे देण्यात आले,
टाकळीमान येथील मराठा समाज बांधवांनी रविवार दि. 29 ऑक्टोबर पासून कामगार तलाठी कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. याप्रसंगी गावातील सर्व मराठा समाज बांधवांनी स्टैंड वर एकत्रित येऊन सर्वच पक्षातील राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदीच्या फलक खाली उभे राहून मराठा आरक्षणाबाबत घोषणा दिल्या. एक मराठा लाख मराठा, आरक्षण नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, जय भवानी जय शिवाजी जय शिवराय या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी घोषणा देत फेरी काढत सर्व मराठा बांधव तलाठी कार्यालय समोर उपोषण स्थळी जमले.
यावेळी छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली. साखळी उपोषणास येथील मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने सुरुवात करण्यात आली.
यावेळी या ठिकाणी ग्राम. उपसरपंच कान्हा खंडागळे, सौ.दिपाली सचिन खंडागळे,सदस्या सौ. छाया मोहन रणनवरे, सदस्य श्री अशोक लालचंद कचे यांनी आपला राजीनामा मराठा आरक्षण समितीकडे सुपूर्द केला. यावेळी काना खंडागळे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ऍड. गुणवंत सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला. या साखळी उपोषण प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते