मानोरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहुरी पोलिसांना यश
मानोरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहुरी पोलिसांना यश
*जबरी चोरीतील आरोपीला पोलीसानी ठोकल्या बेड्या*
शनिवार २१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथील लक्ष्मण रामचंद्र खामकर हे त्यांची पत्नी मुलगी आणी स्वतः पारनेर येथे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई सरुबई खामकर एकट्याच असल्याचा गैरफायदा घेत मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी बंगल्याची बेल वाजवून सीसीटिव्ही कॅमेरा दुरूस्त करण्यास आलो आहे असे सांगुन घरात प्रवेश करून वृद्ध सरूबाई यांच्या तोंडात बोळा कोंबत गंभीर मारहाण केली. सदर मारहाणीत सरूबाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर आरोपींनी गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने घेवुन भामट्यांनी तेथून धूम ठोकली.
या घटनेचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी तात्काळ सुरु करून काही तांत्रिक विश्लेषणाच्या व नागरिकांच्या दिलेल्या महितीवरुन कोल्हार येथील रोहित एकनाथ कानडे वय २४ व गणेश सुनिल लोंढे वय २२ वर्षे रा. चिंचोली फाटा या तरुणांनीच सदर जबरी चोरी केल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक कटारे, पोलीस हवालदार जायभाय, पोलीस नाईक राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके व सचिन ताजने यांनी आरोपीस अनुक्रमे चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून सीताफिने ताब्यात घेतले.
आरोपी गणेश सुनिल लोंढे याला आज रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
आरोपी गणेश सुनिल लोंढे याला राहुरी न्यायालयासमोर हजार केले असता त्याला ३ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे .
रोहित कानडे यास उदयक रोजी मा. न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कटारे करीत आहेत.