अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शहाबाज सय्यदला वीस वर्षांचा तुरुंगवास. राहाता न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शहाबाज सय्यदला वीस वर्षांचा तुरुंगवास.
राहाता न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील एका पिडीत अज्ञान मुलीसोबत कामासाठी म्हणून ओळख निर्माण करून आरोपी शहाबाज रियाजअली सय्यद याने पीडितेला कामासाठी घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सन २०२२ मध्ये राहाता तालुक्यात घडला त्याबाबत पीडित मुलीने शिर्डी पोलीस स्टेशन येथे नराधम आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.*
सदरच्या घटनेचा शिर्डी पोलिसांनी सखोल तपास करून भा.द.वि. कलम ३७६(३),५०४ व बालकांचे लैंगिक आत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४ व ६ अन्वये दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय राहाता यांचे न्यायालयात दाखल केले होते. सदरच्या प्रकरणाचे कामी पीडिता, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार असे एकूण १४ साक्षीदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आले.सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील बी.डी.पानगव्हाणे यांनी कामकाज पाहिले तसेच पिडितेच्या वतीने ऍड. जयवंत आत्माराम जोशी, ऍड. व्यंकेटेश पंढरीनाथ खिस्ते यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.
आरोपी विरुद्ध असलेला प्रथमदर्शनी पुरावा ,सर्व परस्थितीजन्य पुरावे तसेच पीडिता अज्ञान असल्याबाबतचे पुरावे व डीएनए पुरावा प्रकरणात महत्वाचा ठरला. सरकार पक्षाच्या वतीने बी.डी.पानगव्हाणे व पिडितेच्या वतीने ऍड. जयंत आत्माराम जोशी यांनी आरोपीने गुन्हा केल्याचे कुठल्याही शक्यतेपलिकडे शाबीत होत असल्याचा युक्तिवाद करून मा.न्यायालयास आरोपीस जास्तीतजास्त शिक्षा करण्याची विनंती केली.तसेच त्याचे समर्थनार्थ विविध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याचे दाखले कोर्टात सादर केले.
प्रदीर्घ चार वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये सरकार पक्षाचा व पिडितेच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून राहाता येथील विशेष सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी दिनांक ६ मार्च २०२६ रोजी भा.द.वि.कलम ३७६(३),बालकांचे लैंगिक आत्याचरापासून संरक्षण कायदा कलम ४ व ६ अन्वये दोषी धरून आरोपीस विस वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.



