जि प शाळा मुलांना ये जा करणा-या लोखंडी पुलावरील विज जोडण्या उघड्या . चिमुकल्यांना अपघाताचा धोका
जि प शाळा मुलांना ये जा करणा-या लोखंडी पुलावरील विज जोडण्या उघड्या .
चिमुकल्यांना अपघाताचा धोका.
) नगर छत्रपती संभाजी नगर रोडवर घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तेथेच मुलांना थेट शाळेत येण्येयासाठी असणा-या लोखंडी पुरावाच विज वितरण कंपनीने विज जोडणीच्या तारा असुरक्षित पणे बांधल्या असं अनेक जोडण्या उघड्या असल्याने मुलांच्या जीवितास धोका पोहचु शकतो.
रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ असते म्हणुन शासनाने लहान मुलांना शाळेत येत्या जाण्यासाठी लोखंडी पुल बनवला जेणे करुन रस्ता पार करणे सोईचे होईल. मुलांच्या सुरक्षिततेचा शासनाने विचार केला पण विज वितरण कंपनीच्या कर्मचारी वर्गाने त्याला हरताळ फासला. याच लोखंडी पुलावर विज वाहक जोडण्या बांधल्या . त्याही निट न बांधता उघड्यावर ठेवल्या . विज जोडणी साठी स्वतंत्र खांब उभा करुन जोडणी करणे आवश्यक असताना पुलाचा आधार घेत तेथे तारांचे जंजाळाच केले आहे. रस्ता पार करण्या-या जोडण्या ही पुलालाच बांधल्या.सहज हाताला लागतील अगर जोरदार वा-याने पुलाला चिकटतिल अशी जोडण्याची अवस्था आहे. यातुन पुलावर वीजप्रवाह उतरून मुलांच्या जीवितास. धोका होऊ शकतो . एका सजग नागरिकाने हि बाब लक्षात आणुन दिली .
विज वितरण कंपनीने तातडीने येथील विज जोडण्या हटवाव्यात. मुलांच्या व नागरिकांच्या जिवाशी असलेला धोका टाळावा.विज जोड पुलाला बांधुन नयेत अशी मागणी नागरिकांनी केली .