टाकळीभान येथे जलव्यवस्थापन पंधरवाडा साजरा, साडेतीनशे पैकी ,फक्त दहा लाभधारक शेतकरी हजर,

टाकळीभान येथे जलव्यवस्थापन पंधरवाडा साजरा, साडेतीनशे पैकी ,फक्त दहा लाभधारक शेतकरी हजर,
टाकळीभान प्रतिनिधी : जलसंपदा विभागाच्यावतीने टाकळीभान येथे जल व्यवस्थापन पंधरवाडा साजरा करण्यात आला. व साडेतीनशे लाख धारका पैकी फक्त दहा लाभधारक हजर, त्यामुळे लाभधारकांची उदासीनता,
यावेळी पाणी बचतीची शपथ देवून जलव्यवस्थापना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. जलसंपदा विभागाकडून सर्वत्र जलव्यवस्थापन पंधरवाडा साजरा केला जात आहे. येथील ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदाच्या श्रीमती गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी लाभधारक शेतकऱ्यांनी विविध समस्यांबाबत संवाद साधला. समस्या आणि विविध मागण्यांचे जलसंपदा विभागाला निवेदनही देण्यात आले. जलसंपदाचे विजय दाभाडे, पोकळे, बाळासाहेब कोकणे, कालवा निरीक्षक तनपुरे, साळुंके, विनोद साठे, लाभार्थी शेतकरी प्रा. दिलीप कोकणे, प्रा. जयकर मगर, टाकळीभान सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर कोकणे, पाराजी पटारे ,भारत भवार काकासाहेब रणनवरे, भैया पठाण, सुभाष येवले, बाळासाहेब रणनवरे उपस्थित होते. विजय दाभाडे यांनी आभार मानले,
चौकट- जलसंपदा विभागाच्या जल व्यवस्थापन पंधरवडा शेतकऱी व लाभधारकानी फिरवली पाठ, कर्मचारी व अधिकारी संख्या लाभधारका पेक्षा ज्यादा,