तेलकुडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण व धर्मसंमेलन,राजमुद्रा सोहळा

तेलकुडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण व धर्मसंमेलन,राजमुद्रा सोहळा
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या महा पराक्रमी दैवी शक्ती योद्ध्यामुळे आज देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे जगातील विकसनशील देश आजही छत्रपतींच्या प्रगल्भ विचारांचे अनुसरण करत आहेत त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे.महाराष्ट्रातील प्रत्येक गावात भगवा धर्मध्वज हा फडकलाच पाहिजे त्याशिवाय हिंदू धर्मविरोधींना जरब बसणार नाही असे स्पष्ट आणि परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले आहे.*
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव याठिकाणी पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदू स्वराज्य धर्मध्वज लोकार्पण व धर्मसंमेलन,राजमुद्रा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य महाआरती कार्यक्रम प्रसंगी सागर बेग हे बोलत होते.
सागर बेग याप्रसंगी पुढे म्हणाले की,सत्तर वर्षात हिंदू हिंदूं मध्ये फुट पाडून केलेल्या गलिच्छ राजकारणामुळे आज जिहादी प्रवृत्तीचे लोकं निडरपणे हिंदू धर्म विरोधी कारवाया करण्यास घाबरत नाहीत आणि हिंदूंमध्ये एकी नसल्याने आपल्या प्राचीन मंदिरांवर कब्जे करण्याची हिंमत जिहाद्यांची होत आहे हे प्रकार थांबवायचे असतील तर हिंदूंनी जातपात सोडून हिंदू म्हणून भगव्या ध्वजाखाली एक झाले पाहिजे हिंदूंकडे आता त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.तेलकुडगाव सारख्या छोट्या गावाने हिंदूंमधील एकी दाखवून एक नवा अध्याय सुरू केला आहे त्यांचे अनुकरण महाराष्ट्रातील प्रत्येक गावांनी घेतला पाहिजे असे आवाहनही बेग यांनी याप्रसंगी केले.
सकाळी नऊ वाजता सागर बेग यांच्या आगमनानंतर तेलकुडगाव फाट्यापासून मुख्य गावापर्यंत मोटारसायकल रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी शेकडो हिंदू धर्मरक्षक युवकांनी सहभाग घेत जय श्रीराम जय शिवरायच्या घोषणा देत गावातील वातावरण हिंदुमय करून टाकले.तेलकुडगाव गाव व जवळपासच्या वाड्यावस्त्यावरील शेकडो सकल हिंदू समाज गटतट विसरून एक झाला होता.