टाकळीभान शिवमंदीर दर्शनाने ऊर्जा मिळते – समाज प्रबोधनकार शितलताई साबळे
टाकळीभान- प्रतिनिधी- टाकळीभान येथील शंभू महादेव मंदिराला समाजप्रबोधनकार शितलताई साबळे यांनी भेट दिल्यानिमित्त त्यांचा सत्कार करताना यात्रा कमिटी सदस्य.
टाकळीभान शिवमंदीर दर्शनाने ऊर्जा मिळते – समाज प्रबोधनकार शितलताई साबळे
टाकळीभान, ता.१३: मला राज्य किंवा राज्याबाहेर कथा कीर्तनाच्या निमित्ताने शिवालय दर्शनाचा योग येत असतो मात्र येथील शिवमंदीर अद्भुत असून शिवालयापासून ऊर्जा मिळाली अशी अनुभव व्यक्त प्रतिक्रिया समाजप्रबोधनकार शितलताई साबळे यांनी दिली.
साबळे या दोन महिन्यापूर्वी शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त कीर्तन सेवेसाठी आल्या होत्या. त्या पुन्हा (ता.१२) रोजी येऊन शंभू महादेवाचा रुद्राभिषेक केला यावेळी पुरोहित सुदाम देवळालकर व महादेव यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. महादेवाने मला पुन्हा दर्शनासाठी बोलावले असावे दर्शनाने मी पूर्णपणे समाधानी व मनाला शांती मिळाली आहे. येथे आल्यावर मला एक अद्भुत शक्तीचे दर्शन झाल्यासारखे वाटले. यापुढे मला कधीही कीर्तन सेवेसाठी बोलावले तर मी हजर राहील असे समाजप्रबोधनकार साबळे म्हणाल्या.
श्री शंभू महादेव यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर फर्निष प्लाझा फर्निचरचे संचालक अनिल लांडगे यांनी संतपूजन केले.