ब्रेकिंग

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ,सेवाभावी व समाजाभिमुख लोकोपकारी उपक्रम करणारे प्रतिष्ठान

 

{“डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख लोकोपकारी उपक्रम करणारे प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण ,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर इत्यादी तसेच गरजूंना शालेय साहित्य पुरवणे, साक्षरता वर्ग चालवणे, विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबवले जातात. आज दि.१५ मे हा दिवस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस दिवस असून त्यानिमित्ताने प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. या अंतर्गत आज अ. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर

 येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियान सकाळी ७:३० वा. सुरू झाले व १०:३० वाजेपर्यंत शिस्तबद्ध रीतीने पूर्ण झाले. यात प्रतिष्ठानच्या १६६ सदस्यांनी सहभाग नोंदवला ४७०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली कार्यालये , ८ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून. १३.८ टन कचरा गोळा केला म.न.पा /ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले ,कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली सदर उपक्रमाला तेथील कार्यालयातील शासकीय अधिकारी, नगरसेवक, मनपा अधिकारी व विविध पदावर असलेले मान्यवर उपस्थित होते सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठान च्या पुढील कार्य मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या”}

मा. शेखर शेठ दुबैय्या नगरसेवक,

मा. दिपक चव्हाण नगरसेवक;

मा. रवी पाटील नगरसेवक,

मा अरुण पाटील शिवसेना प्रमुख,

मा . प्रकाश चित्ते उपाध्यक्ष भाजपा, 

मा. नागेशभाई सावंत पत्रकार, मा आशिष धनवटे नगरसेवक,

मा. संजय सानप साहेब पी.  आय,

मा. करणदादा ससाणे उपनगर ध्यक्ष ( कॉग्रेस)

मा. दिलीप नागरे नगसेवक,

मा. किरण लुणीया. वरील मान्यवरानी आपल्या प्रतीक्रिया व्यक्त केल्या. कार्यालय पोलीस स्टेशन. ओबेरॉय पेट्रोल पंप ते जलतरण तलाव. सुतगिरणी फाटा ते गपपती नेत्रालय ह्या रस्त्याची स्वच्छता केली.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे